Monday, May 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयेत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून,येत्या,२०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे.त्यानुसार,सर्व विद्यार्थ्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव प्रथम नमूद केले जाणार आहे.विशेष म्हणजे,यापूर्वी वडिलांचे नाव प्रथम राहायचे.मात्र,आता आईचे नाव,वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव असा नवीन क्रम निश्चित करण्यात आला आहे.हजेरीपत्रक,गुणपत्रक,शाळा सोडल्याचा दाखला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आणि शाळा सोडल्याचा  दाखला(प्रवेश निर्गम उतारा)या सर्व कागदपत्रांवर आईचे नाव नमूद केले जाईल.त्याचबरोबर, विभक्त-घटस्फोटित पालक व दत्तक मुलांच्या बाबतीत परिस्थितीनुसार योग्य ती नोंद ठेवण्याची तरतूद करण्यात येणार आहे.सदरचा नियम शासकीय,अनुदानित आणि खासगी या सर्व शाळांमध्ये एकसमान लागू होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!