Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'त्या' आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले असतांनाही एखादा आमदार किंवा खासदार म्हणजेच लोकप्रतिनिधी जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांना भेटायला जातात तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने उठून उभे राहत त्यांना अभिवादन करावे असा नोव्हेंबर २०२५ मध्ये जीआर काढण्यात आला.मात्र आता त्यात एक सुधारणा करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,पोलिस,महसूल अधिकारी यांना काही प्रकरणात दंडाधिकारी अर्थात न्यायालयासारखे अधिकार असतात. त्यात या अधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा येते.त्यामुळे आता सरकारने यात थोडी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी कशासाठी कार्यालयात आले आहेत किंवा बोलाविले आहेत,यावर असे अभिवादन करायचे की नाही ते ठरले जाणार आहे. एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी अथवा इतर प्रकरणात दोषी ठरला असल्यास,चौकशी,सुनावणीसाठी अपीलकार,पक्षकार म्हणून बोलाविण्यात आले असल्यास अधिकारी अभिवादन करू शकत नाही.तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना उमेदवारी अर्ज भरणे, छाननी,सुनावणी इत्यादी वेळेस शासकीय कार्यालयात उपस्थित राहिले असल्यास आमदार, खासदार यांना अधिकाऱ्याने अभिवादन करण्याची गरज व शासकीय कार्यालयांत कोणतीही विशेष वागणूक देऊ नये,असे स्पष्ट आदेश काल मंगळवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले.मात्र,इतर आमदार वा खासदार शासकीय कार्यालयात आल्यास आणि कार्यालयातून निघून जातांना,सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवरून उभे राहून स्वागत,अभिवादन करणे अनिवार्य आहे. लोकप्रतिनिधींशी संवाद साधतांना अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण,नम्र आणि आदरयुक्त भाषा वापरणे अपेक्षित आहे.मोबाईल किंवा टेलिफोनवर बोलतांनाही अधिकाऱ्यांनी आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे.लोकप्रतिनिधींच्या तक्रारी काळजीपूर्वक ऐकून घेऊन,नियमांनुसार कामांचा त्वरित आढावा घेणे बंधनकारक आहे.आमदार-खासदारांच्या पत्रांची नोंद ठेवून,त्यांना कमाल दोन महिन्याच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!