Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअजी लग्नाचा खर्चही आम्हीच करतो; फक्त मुलगी तरी द्या.! - वधू पक्षाचे...

अजी लग्नाचा खर्चही आम्हीच करतो; फक्त मुलगी तरी द्या.! – वधू पक्षाचे भाव वधारले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आताच्या काळात एखाद्या रिकामटेकड्या व्यक्तीने लग्न करतो म्हटले तर काही खरे नाही.आता लग्नाची चित्रे पार बदलून गेली आहेत.हुंडा पद्धत बंद होऊन आता मुलाकडचेच लग्नाचा खर्च उचलण्यास तयार आहेत.मुलगी कोणत्याही जातीची किंवा गरीब असली तरी चालेल,अशी भूमिका अनेक वर पक्षांनी घेतली आहे.लग्न जुळवण्यासाठी अनेक संस्था आणि मध्यस्थ सक्रिय झाले असून,त्यासाठी मोठी रक्कम उकळली जात आहे.लग्नासाठी वधू पक्षाकडून आता “स्टायलिश नवरा” हवा,अशी पहिली अट असते. त्यासोबतच सरकारी नोकरी किंवा मोठे सॅलरी पॅकेज, स्वतःचा बंगला,गाडी आणि शहरात वास्तव्य.अश्यातच शेतकरी वरांना मात्र स्पष्ट नकार दिला जात आहे.या अवास्तव अपेक्षांमुळे लग्नाचे वय उलटून जात आहे. वाढत्या वयामुळे तरुणांमध्ये टक्कल पडणे,लठ्ठपणा, मानसिक तणाव यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत.त्यातच,वयाची ३० ते ३५ वर्षे उलटून गेल्यावर नाईलाजाने घटस्फोटित स्थळांचा विचार करण्याची वेळ येत आहे.विशेषतः मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटल्याने वधू पक्षाचे भाव वधारले आहेत.कमी शिक्षित मुलींनाही आता उच्चशिक्षित आणि श्रीमंत पती हवा असल्याने मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लग्ने रखडली आहेत.त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात लग्नाचे चित्र कमालीचे बदलले आहे.पूर्वी ज्येष्ठ मंडळी सोयरिकी जुळवत असत,मात्र आताच्या फाइव्ह जी आणि डिजिटल युगात ही जागा शादी डॉट कॉम, इंस्टाग्राम आणि फेसबुकने घेतली आहे.विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत वधू पक्षाच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की,उपवर मुलांच्या पालकांना हुंडा नको,लग्नाचा खर्चही आम्हीच करतो,फक्त मुलगी तरी द्या,असे म्हणण्याची वेळ आली आहे.शिक्षण आणि करिअरच्या शर्यतीत आता भेटीगाठी घेण्यापूर्वीच मोबाइलवर बायोडाटा आणि फोटोंची देवाणघेवाण होत आहे.तिथेच होकार अन् तिथेच नकार ठरवला जातो. यामुळे पारंपरिक कांदे-पोहे कार्यक्रम आता कमी झाले असून,सोशल मीडियावरूनच नाती जोडली किंवा तोडली जात आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!