Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीभीषण अपघात.. चारचाकी वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक.. - पतीचा जागीच मृत्यू...

भीषण अपघात.. चारचाकी वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक.. – पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरात आज,गुरुवार १९ मार्च रोजी भीषण अपघाताची घटना घडून दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला,तर पाठीमागे दुचाकीवर बसलेली पत्नी गंभीर जखमी झाली.सदरची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास गडचिरोली शहराच्या चामोर्शी मार्गावरील समतानगर(कैकाडी वस्ती)समोर घडली. हेमंत देवनाथ शेंडे वय ४५ वर्षे,रा.औंधी,जि.मानपूर, छत्तीसगड,हल्ली मुक्काम समतानगर,गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या पतीचे नाव आहे,तर नीतू हेमंत शेंडे वय ३६ वर्षे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.
हेमंत शेंडे व त्यांची पत्नी नीतू शेंडे हे दोघेही दुचाकीने समतानगर येथे जाण्यासाठी निघाले होते.समतानगर समोरील मार्गावर येताच त्यांनी उजवीकडे वळण घेत असतांनाच चामोर्शीकडून गडचिरोली शहराकडे येणाऱ्या चारचाकी स्कार्पिओ वाहनाची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली.यात दुचाकीवरील  हेमंत शेंडे यांनी जागीच प्राण सोडला.तर पत्नी नीतू शेंडे गंभीर जखमी होऊन त्यांच्या पायाला मार लागला.विशेष म्हणजे, अपघात घडताच गडचिरोली येथील ३१ वर्षीय स्कार्पिओ चालक सुधीर भुरले यांनी घटनास्थळावरून पळून न जाता सर्वप्रथम जखमी महिलेची मदत करून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले व अपघाताची माहिती स्वतः गडचिरोली पोलिसांना दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!