Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'(PM-Kisan) योजनेचा २२ वा हप्ता आज,शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पीएम किसान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी देय असलेल्या २२ व्या हप्त्याकरिता एकूण १ लाख ५४ हजार पात्र शेतकरी निश्चित करण्यात आले आहेत. यातील शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे(DBT)निधी वितरित करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.ज्या शेतकऱ्यांचे ई -केवायसी पूर्ण आहे,बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि भूमी अभिलेख नोंदणी पूर्ण आहे,अशाच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दर चार महिन्यांनी दिला जातो आणि वर्षाला ६ हजार रुपये वितरीत करण्यात येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!