Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज भारत विरुद्ध पाकिस्तान ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप सामना..

आज भारत विरुद्ध पाकिस्तान ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप सामना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-क्रिकेटचा एकदिवसीय सामना असो वा सिरीज सामना असो,भारत विरुद्ध इतर देशांशी होणारे सामने पाहण्यात जितके रस नाही,त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,त्याचबरोबर जगभरात अनेकजण उत्सुक असतात.अश्यातच आज, रविवार १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप-२०२६ स्पर्धेतील २७ व्या गटातील ट्वेंटी-२० चा सामना खेळवला जाणार असल्याने आज सकाळपासूनच क्रिकेट चाहत्यांना या हाय-व्होल्टेज सामन्याची नशा चढल्याचे दिसून येत आहे.सदरचा सामना आज रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार असून सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.तर टॉस साडेसहा वाजता सुरू होणार आहे.चाहत्यांसाठी हा केवळ सामना नसून प्रतिष्ठेची लढाई आहे,ज्यात प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव निर्णायक ठरू शकते.ट्वेंटी-ट्वेंटीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत १६ वेळा आमनेसामने आले आहेत.त्यात,भारताने तब्बल १३ सामने जिंकले,तर पाकिस्तानने ३ तीन सामने जिंकलेत.त्यामुळे,आजचा सामना अत्यंत रंगतदार होऊन रात्रीच्या सुमारास क्रिकेट प्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी पहावयास मिळणार आहे.
टीम :-
भारत : सूर्यकुमार यादव(कॅप्टन),ईशान किशन,संजू सैमसन,अभिषेक शर्मा,तिलक वर्मा,रिंकू सिंह,अक्षर पटेल,शिवम दुबे,हार्दिक पांड्या,वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंह,कुलदीप यादव,हर्षित राणा,वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : सलमान अली आगा(कॅप्टन),अबरार अहमद,बाबर आजम,फहीम अशरफ,फखर जमां, ख्वाजा नफे,मोहम्मद नवाज,मोहम्मद सलमान मिर्जा, नसीम शाह,साहिबजादा फरहान,सईम अयूब,शाहीन शाह अफरीदी,शादाब खान,उस्मान खान,उस्मान तारिक.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!