Monday, October 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज' अभियानास मुदतवाढ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानास मुदतवाढ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेत जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढविणे,स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावणे यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा देणे,आरोग्य,शिक्षण,उपजीविका व सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून हे अभियान सुरू झाले आहे.या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत  होता.अश्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेत ग्रामीण भागातील ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.या निर्णयामुळे प्रलंबित असलेली कामे पूर्ण करता येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.यात प्रलंबित घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मिळणारी ५० टक्के सवलत आता पुढील काही महिने घेता येणार आहे.शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेत जास्तीत जास्त नागरिकांनी आपली थकबाकी भरून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हे अभियान सुरू केले आहे.आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.मुदतवाढीमुळे ग्रामपंचायतींच्या महसुलात वाढ होऊन विकासकामांना गती मिळणार आहे.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याने कार्यक्षमता, पारदर्शकता व स्पर्धात्मक विकासाला चालना मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!