Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियागावकऱ्यांचा सरपंचाला दे धक्का; सरपंच पदावरून हटवले..

गावकऱ्यांचा सरपंचाला दे धक्का; सरपंच पदावरून हटवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-विकास कामे करतांना सदस्यांना डावलणे, कामांसाठी पैशांची मागणी करणे,शासकीय जमिनीचे बेकायदेशीर प्लॉटिंग करून आर्थिक व्यवहार करणे,
वकिली पेशाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावणे आणि विरोधात बोलणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून पदाचे वर्चस्व दाखविणाऱ्या थेट सरपंचास गावकऱ्यांनी घरचा रस्ता दाखविल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील खुर्शिपार ग्रामपंचायतीत उघडकीस आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्याचा अखेर धक्कादायक अंत झाला आहे.सरपंच हेमलता चव्हाण यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल ६६० विरूध्द शून्य अशा ऐतिहासिक फरकाने मंजूर झाला आहे.विशेष म्हणजे, सभेला उपस्थित असलेल्या एकाही मतदाराने सरपंचांच्या बाजूने मतदान केले नाही,ज्यामुळे चव्हाण यांना आपले पद गमवावे लागले आहे.सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.तहसीलदारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केला.प्रकरणी सरपंच हेमलता चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.आपल्यावर अन्याय होत असून जातीपातीचे राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, ‘गावकरी ते राव न करी’ याप्रमाणे गावकऱ्यांनी रोष व्यक्त करून सरपंचाला पदावरून हटवले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!