Thursday, August 13, 2026
Homeगडचिरोलीआज राज्याच्या मुख्य सचिवांद्वारे ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानातील विकासकामांची पाहणी..

आज राज्याच्या मुख्य सचिवांद्वारे ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानातील विकासकामांची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज,मंगळवार २० जानेवारी रोजी चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा मंदिरास भेट तेथे सुरू असलेल्या जिर्णोद्धार तसेच विविध विकासकामांची पाहणी केली.मंदिराच्या ऐतिहासिक वारशाला साजेशा पद्धतीने,दर्जेदार व कालबद्ध रीतीने ही कामे पूर्ण व्हावीत,अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या.
मुख्य सचिवांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासह परिसरातील घाट,वाहनतळ,उद्यान(बगीचा), स्वच्छतागृह तसेच अंतर्गत व बाह्य सौंदर्यीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.या कामांदरम्यान येणाऱ्या अडचणी,तांत्रिक बाबी तसेच पुढील टप्प्यातील नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी विभागीय आयुक्त तथा प्रधान सचिव विजयालक्ष्मी बिदरी,पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल,पुरातत्त्व अधिक्षण अरूण मलिक,तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी एम.अरूण प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे अधीक्षक अभियंता समय निकोसे यांनी सादरीकरणाद्वारे मंदिराच्या बाह्य परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली.मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून,रस्ता,वाहनतळ व स्वच्छतागृहांची कामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच दुसऱ्या टप्प्यात नदीघाटाचे प्रवेशद्वार तसेच इतर पूरक विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू यांनी मंदिराच्या दुरुस्ती व जतन विषयक कामांची माहिती दिली,तर अभ्यासक शिवाली शर्मा यांनी मार्कंडा मंदिराच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक व वास्तुशास्त्रीय महत्त्वाबाबत सविस्तर माहिती दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!