Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोली“मिशन-२०० उपक्रम" देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी..

“मिशन-२०० उपक्रम” देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना योग्य दिशा व सातत्यपूर्ण मार्गदर्शन देणारा नियोजित ‘मिशन-२००’ हा उपक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड ठरेल,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी समाज कल्याण विभागामार्फत आयोजित तीन दिवसीय निवासी फाउंडेशन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
समाज कल्याण विभाग गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देशातील तसेच देशाबाहेरील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी करून देण्यासाठी ‘मिशन-२००’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांना भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(JNU),दिल्ली विद्यापीठ (DU),टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स(TISS), अजीम प्रेमजी विद्यापीठ,शिव नाडर विद्यापीठ,पिरमल विद्यापीठ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(IIT),इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठांच्या परीक्षांची नियोजित तयारी करून दिली जाणार आहे.या उपक्रमासाठी संकल्प फाऊंडेशन यांच्या माध्यमातून वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार असून,ज्या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणतः ४ ते ५ लाख रुपये आहे,ते अभ्यासक्रम समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातच पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रमांची निवड,अर्ज भरणे,प्रवेश परीक्षा तयारी ते अंतिम प्रवेश मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विभागाकडून मार्गदर्शित केली जाणार आहे.
कार्यशाळेदरम्यान देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे निवड झालेल्या विशाल मेश्राम,युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम येथे निवड झालेल्या अभय पेंदाम तसेच इटरनल युनिव्हर्सिटी हिमाचल प्रदेश येथे निवड झालेल्या कुमारी चैतन्या गोमसकार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी,संकल्प फाऊंडेशनचे संचालक पंकज नरुले उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!