- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.यासाठी येत्या,१५ जानेवारी रोजी मतदान व १६ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अश्यातच आज,मंगळवार १३ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा केली आहे.पण,राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार नाहीत.कारण ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.अशा २० जिल्हा परिषदा आणि ८८ पंचायत समित्या आहेत.या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २१ जानेवारी रोजी न्यायालयात होणार आहे.त्यामुळे आता केवळ १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.विशेष म्हणजे,राज्यात सध्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद पार पडली.या पत्रकार परिषदेत राज्य निवडणुक आयोगाचे दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार,जिल्हापरिषदेच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर,तर कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग,तर छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, परभणी,धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आहेत.१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीत प्रत्येकाला दोन मत मतदान करण्याचा अधिकार असेल.एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी.निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबरला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे. आजपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आचारसंहिता जाहीर झालेली आहे.
- निवडणूक कार्यक्रम👇
अर्ज स्वीकारण्याची तारीख- १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
अर्जाची छाननी- २२ जानेवारी २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत- २७ जानेवारी २०२६, दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम उमेदवारी यादी,निवडणूक चिन्ह वाटप- २७ जानेवारी दुपारी ३ नंतर
अंतिम उमेदवारांची यादी- २७ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक- ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणीचा दिनांक- ७ फेब्रुवारी २०२६
- Advertisement -

