उद्रेक न्युज वृत्त :-‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी उद्या,बुधवार ३१ डिसेंबर ही ई-केवायसी करण्याची शेवटी तारीख असल्याने ज्या महिलांनी अजूनपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल अशांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी,अन्यथा महिन्याकाठी मिळणारे दीड हजाराचे लाभ बंद होऊ शकते.महायुती सरकारने जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली.या योजनेतील अटीनुसार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. महिला व बालविकास विभागाने या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवावा म्हणून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती.पहिल्यांदा ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी १८ पूर्ण नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.त्यानंतर मुदतवाढ देत ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.ई-केवायसीसाठी एकच दिवस शिल्लक असतांनाच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. विशेष म्हणजे,योजनेच्या सुरुवातीला कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आले नाही.अश्यातच आता ई-केवायसीची अट घातल्याने काहींच्या हातून चूक झाली तर लाभ बंद होणार असल्याने सुरुवातीला लाडक्या वाटणाऱ्या बहिणी आता सरकारला नकोशा झाल्या की काय? असा प्रश्न काही महिलांच्या मनात घर करून सोडत आहे.
त्वरा करा..! लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी उरला एक दिवस..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

