Monday, July 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज तीन नक्षलवाद्यांचा खात्मा; एका महिला नक्षलीचा समावेश..

आज तीन नक्षलवाद्यांचा खात्मा; एका महिला नक्षलीचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगड राज्याची नक्षल मुक्तिकडे वाटचाल सुरू असून नुकतेच १६ डिसेंबर रोजी बीजापूर जिल्ह्यात तब्बल ३४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून जंगलो-पहाडातील नक्षली जीवन सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्धार केला.अश्यातच आज,गुरुवार १८ डिसेंबरच्या पहाटे उडालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले असून यात एका महिला नक्षलीचा समावेश आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोलापल्ली परिसरातील जंगल व डोंगराळ भागात उडाली.यात सोढी बंडी,माडवी जोगा उर्फ मुन्ना व महिला नक्षली नुप्पो बजनी अशी खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून तिघांवर १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.गोलापल्ली परिसरातील जंगल व डोंगराळ भागात नक्षलवादी दबा धरून बसल्याची माहिती मिळताच आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास जिल्हा राखीव दल(डीआरजी) शोधमोहीम राबवित असतांना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.सुरक्षा दलांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले.सकाळपासून दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता.यात तीन नक्षलवादी ठार झाले. चकमकीनंतर गोलापल्ली आणि आसपासच्या जंगल परिसरातील डोंगराळ भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!