Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीहृदयरोगग्रस्त बालकांसाठी विशेष तपासणी शिबीर संपन्न... - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते...

हृदयरोगग्रस्त बालकांसाठी विशेष तपासणी शिबीर संपन्न… – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते ‘बाल २डी-ईको’ मशीनचे उद्घाटन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय  गडचिरोली येथे हृदयरोगाच्या संशयित बालकांसाठी आयोजित करण्यात आलेले २डी-ईको तपासणी शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.या शिबिराचे तसेच डीईआयसी विभागातील ‘बाल २डी-ईको’ मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोगग्रस्त बालकांच्या पालकांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.जन्मत: हृदयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचार व शस्त्रक्रियेद्वारे बालकांचे आरोग्यपूर्ण भविष्य घडविणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरबीएसके-डीईआयसी कार्यक्रमाच्या माध्यमातून ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके व विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येते.या तपासणीदरम्यान जन्मत: आजार किंवा हृदयरोगाची शंका असलेल्या बालकांची पुढील तपासणी,निदान निश्चिती,तज्ञ सल्ला,विशेष चाचण्या व आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील “जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र” (डीईआयसी)द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष म्हणून कार्यरत आहे.गरज भासल्यास तृतीयस्तरीय आरोग्य सेवेसाठीही येथून व्यवस्थापन करण्यात येते.मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या २डी-ईको तपासणी शिबिरामध्ये नागपूर येथील प्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रमोद अंबदकर व त्यांचे तज्ञ पथक उपस्थित होते.या शिबिरात एकूण २०० बालके व विद्यार्थ्यांची २डी-ईको तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ४१ बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले असून काही बालकांचा पुढील पाठपुरावा करणे गरजेचे आहे. निदान निश्चित झालेल्या बालकांच्या पालकांना तज्ञांकडून सविस्तर समुपदेशन करण्यात आले. राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र बालकांना तृतीयस्तरीय संदर्भसेवेसाठी डीईआयसीमार्फत आवश्यक व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवनिर्मित इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.तसेच रुग्णालयातील कार्यरत सर्व विभागांना भेट देऊन उपलब्ध आरोग्य सेवा व सुविधांबाबत सविस्तर माहिती घेतली.दुर्गम व आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात तज्ञ आरोग्य सेवा जिल्हा स्तरावरच उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंखे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत पेंदाम,डीईआयसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांच्या नियोजनात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम(आरबीएसके)सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र, बाल आरोग्य विभाग जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजित करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!