Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीदिना धरणाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करावे- शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा

दिना धरणाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करावे- शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्याला जीवनदायी ठरलेले रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय(दिना धरण)सध्या गाळाने भरलेले असून त्याची जलसाठा क्षमता घटली आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी प्रशासनाकडे धरणाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली आहे.
“दिना धरण हे चामोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या शेतीसाठीच्या सिंचनाचे महत्त्वाचे साधन आहे.मात्र, अनेक वर्षांपासून धरणाचे खोलीकरण झाले नसल्याने गाळ साचून पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. परिणामी दुबार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे.दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासते.यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून धरणाचे खोलीकरण तातडीने करण्यात यावे,” अशी मागणी प्रशांत शाहा यांनी केली आहे. त्याचबरोबर “धरण परिसरात वृक्षारोपण,सिमेंट बेंच,फेरफटका मार्ग,तसेच मुलांसाठी खेळण्याची साधने उभारून येथे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे.यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल.” याकरीता तात्काळ उपाययोजना करावी,असेही शाहा म्हणाले.स्थानिक ग्रामस्थांनी या मागणीला मोठा प्रतिसाद दिला असून, ‘दिना धरणाचे पुनरुज्जीवन म्हणजे रेगडीचा विकास’ असा विश्वास नागरिकांनी व्यक्त करून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!