Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्विटर अकाऊंट हॅक..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्विटर अकाऊंट हॅक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर(सध्याचे ‘एक्स’)अकाउंट आज,रविवार २१ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास अज्ञातांनी हॅक केले.शिंदे यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर  पाकिस्तान आणि तुर्कीच्या झेंड्यांचे फोटो पोस्ट करण्यात आले होते.सदरची बाब सोशल मीडिया हॅण्डल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर क्राईम ब्रांचला माहिती देत अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली.सायबर क्राइम पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही तासांतच अकाउंटवर नियंत्रण मिळवत एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाउंट पूर्ववत सुरू केले.वेळीच लक्षात आल्याने इतर बाबी टळल्या.प्रकरणी अज्ञात हॅकर्सचा राज्य सायबर सेलकडून शोध सुरू आहे. सध्या स्थितीत एआयचा गैरवापर तसेच डिजिटल सेवांमुळे सायबर गुन्हेगारी वाढू लागली आहे.त्यामुळे संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा,मजबूत पासवर्ड वापरा आणि ताबडतोब १९३० वर कॉल करा,जेणेकरून सायबर फसवणूक टाळता येईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!