Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'आम्ही इथे मरत आहोत आणि तू व्हिडिओ बनवत आहेस'-महिलेचा राग अनावर ...

‘आम्ही इथे मरत आहोत आणि तू व्हिडिओ बनवत आहेस’-महिलेचा राग अनावर – धावत्या बसवर झाड कोसळून ५ जणांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला सगळीकडेच
फोटो वा व्हिडिओ बनविण्याचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.एखादा अपघात घडला तर लोकं अपघातग्रस्तांची तात्काळ मदत करण्याऐवजी सर्वप्रथम फोटो व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करीत असतात.अश्याच प्रकारे आज,शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे मुख्य मार्गावरून धावणाऱ्या बसवर भला मोठा झाड कोसळून घडलेल्या अपघातात ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अनेक प्रवासी अडकून पडलेले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाचव कार्य सुरू आहे.बसवर झाड कोसळतच बसचे वरील छत पूर्णपणे चक्काचूर होऊन त्यात जीवित महिला अडकून फसली.अश्यातच एका तरुणाने महिलेला काढण्याऐवजी अपघाताचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करीत असतांनाच महिलेचा राग अनावर झाला आणि तिने त्याला भाषण सुनावले.ती महिला त्याला म्हणाली की, ‘आम्ही इथे मरत आहोत आणि तू व्हिडिओ बनवत आहेस.जर तू येऊन झाडाची फांदी काढण्यास मदत केली असती तर आम्ही बाहेर आलो असतो’.असे म्हणताच तरुणाने बचाव कार्यास हातभार लावला.
बसमधील प्रत्यक्षदर्शिंच्या मते बस भरलेली होती.बरेच लोक उभे होते,मग ड्रायव्हरने एक शब्द उच्चारला आणि झाड कोसळले.यानंतर,ड्रायव्हर आणि चार महिलांचा मृत्यू झाला,हे लोक केबिनजवळ बसले होते.मी मागे होतो,त्यामुळे मी थोडक्यात बचावलो.मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून त्यात शिक्षा मल्होत्रा वय ५३ वर्षे,अनोज वय ४५ वर्षे यांचा समावेश आहे.शिक्षा मल्होत्रा प्राथमिक शाळा कादीपूर येथे तैनात होती.चालक आणि आणखी एका शिक्षिकेची अद्याप ओळख पटलेली नाही.अपघातात जखमी झालेल्या एका महिला शिक्षिकेने सांगितले की,आम्ही सर्व शिक्षक हैदरगड येथील आपापल्या शाळांमध्ये जाण्यासाठी निघालो होतो,तेव्हा बाराबंकीतील हरख चौकाजवळ अचानक चालत्या बसवर झाड कोसळले.
आज सकाळच्या सुमारास ६० जणांना घेऊन जाणारी बस बाराबंकीहून हैदरगढला जात होती.अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता.झाड इतके मोठे होते की बसचे छतच कोसळले.स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!