Sunday, September 6, 2026
Homeलातूरहैवान बापाने चार वर्षीय चिमुकलीची साडीने गळफास लावून केली हत्या.. -...

हैवान बापाने चार वर्षीय चिमुकलीची साडीने गळफास लावून केली हत्या.. – चिमुकलीने चॉकलेटसाठी मागितले होते पैसे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
लातूर :-जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमातांडा येथे दारूच्या आहारी गेलेल्या एका हैवान बापाने आपल्याच चार वर्षीय चिमुकलीची राहत्या घरी साडीने गळफास लावून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार २९ जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. आरुषी बालाजी राठोड असे मृत चार वर्षीय चिमुकलीचे नाव असून तिने केवळ चॉकलेट खाण्यासाठी बापाकडे पैसे मागितले होते.
भीमातांडा येथील आरोपी बालाजी बाबु राठोड हा दारूच्या आहारी गेला होता.त्यामुळे तो सतत दारू पिऊन पत्नीशी भांडण तसेच तिला मारहाण करायचा. दररोज होणाऱ्या त्रासापायी पत्नी मुलीसह काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती.त्यामुळे आरोपी बालाजी हा काही दिवसांपूर्वी सासरी गेला होता व मुलीला आपल्याकडे घेऊन आला होता.बालाजी हा काही कामानिमित्त बाहेर गेल्यावर मुलीला त्याच्या  आईजवळ सोडत असे.अश्यातच आज रविवारी दुपारच्या सुमारास मुलीने चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले आणि रडायला सुरुवात केली.त्यामुळे चिडलेल्या हैवान बापाने स्वतःच्याच चार वर्षीय चिमुकलीचा राहत्या घरीच घरातील साडीने गळा आवळला व गळफास लावून हत्या केली.प्रकरणी त्याच्या पत्नीने ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानुसार हैवान आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावित्रा रायपल्ले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!