Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता सातबाऱ्यासह इतर दस्तऐवज मिळणार थेट व्हॉट्सॲपवर..

आता सातबाऱ्यासह इतर दस्तऐवज मिळणार थेट व्हॉट्सॲपवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतजमिनी संबंधित कागदपत्रांसाठी ऑनलाईन सेतू केंद्रांत होणारी गर्दी व शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी व्हावा; यासाठी शासनाच्या महाभूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता आता सातबाऱ्यासह इतर दस्तऐवज थेट व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत.त्यानुसार येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून सातबारा उतारा,८अ उतारा, फेरफाराची नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे महत्त्वाचे दस्तऐवज नागरिकांना केवळ १५ रुपयांत थेट व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सदरची योजना ही येत्या १५ जुलैपासून सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.त्यानंतर संपूर्ण राज्यात ही योजना पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करण्यास फायदेशीर ठरणार आहे.या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा ई-सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही.यामुळे फसणवूकीचे प्रकार टाळले जाऊ शकणार आहेत.ही सेवा केवळ १५ रुपयांमध्ये आहे.यामुळे कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होणार आहे.
सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टल
 पोर्टलवर जाऊन नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागणार आहे.नोंदणीसाठी एकदाच ५० रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे.यावेळी मोबाईल क्रमांक ओटीपी (OTP)द्वारे पडताळला जाणार आहे.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा,८ अ,फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स सहजपणे व्हॉट्सॲपवर डाउनलोड करता येतील.संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे मध्यस्थांचा अथवा एजंटचा हस्तक्षेप नसणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!