- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आम्ही नेहमीच सांगत असतो की, ‘ग्राहक हा बाजारपेठेचा राजा’ आहे.दुकानातील वा एखाद्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवेबद्दल ग्राहक समाधानीच नसेल तर विक्री करणाऱ्या वस्तू,साहित्य वा उत्पादनांचा उपयोग काय? त्यातच कित्येकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते व कमी किंमतीची वस्तू जास्त किंमतीत, खराब साहित्य,कालावधी संपलेली उत्पादने वा नाना तऱ्हेच्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. अश्यातच ग्राहकांनी मुकाटपणे साहित्य घेऊन गप्प बसू नये.जाऊ द्या.! काय करायचे आहे,असे म्हणून आपण व्यावसायिकांना ढील देत असतो.त्यामुळेच आपल्या सोबत असे घडत असते. अश्यांना धडा शिकवणे गरजेचे असते.त्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अनादिकाळापासून प्रत्येक जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत.ग्राहक तक्रार निवारण आयोगात वकील करण्याची गरज नसते.आपण आपली बाजू स्वतःही मांडू शकता.एखाद्या व्यवसायिकाने वा पुरवठाधारकाने आपली फसवणूक केली आहे; असे निदर्शनास आल्यास पहिल्यांदा त्याच्याशी संपर्क साधा,पत्रव्यवहार करा,ऐकत नसेल तर ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घ्या.अश्याच प्रकारे नुकत्याच एका प्रकरणात गडचिरोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने देसाईगंजच्या साहित्य पुरवठाधारकास दणका दिला आहे.यात
आधीच यांत्रिक बिघाड असलेली आटा-मसाला पिसाई मशीन,डाळ भरडाई मशीन,मुरमुरा रोस्टर मशीन व पॅकिंग मशीन ग्राहकाला पुरवठा करून दिशाभूल केली.महिलेने अनेकदा त्याबाबत दुकानदाराला कळविले.पण तोडगा निघाला नाही.त्यामुळे महीलेले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व कृषी विभागालाही तक्रार दिली. मात्र,कुणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर महिलेने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली.त्यानुसार देसाईगंज येथील मशीन पुरवठादाराला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे.माहितीनुसार,कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आरमोरी तालुक्याच्या टेंभा चक येथील वंदना रामकृष्ण कारमेंगे यांनी देसाईगंज येथील बांगळकर हार्डवेअर आयड मशिनरी येथून आटा,मसाला पिसाई व डाळ भरडाई मुरमुरा रोस्टर व पॅकिंग मशीन ३ लाख ६० हजार रुपयांत खरेदी केली.सदर मशीन वंदना कारमेंगे यांनी घरी आणून इन्स्टॉल केली; परंतु ती कार्यान्वित झाली नाही. कारमेंगे यांनी अनेकदा बांगळकर मशिनरीला सूचित केले.त्यांनी बिघाड काढण्याचा प्रयत्न केला.मात्र तोडगा निघाला नाही.कुणीही दखल घेत नसल्याने त्यांनी गडचिरोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली.त्यानुसार आयोगात सूनावण्या झाल्या.यात देसाईगंज येथील बांगळकर हार्डवेअर आयड मशिनरी पुरवठाधारक दोषी आढळले.त्यानुसार आयोगाने वंदना कारमेंगे यांच्या बाजूने निकाल लागला व आदेशात एका महिन्याच्या आत तक्रारदाराला एकतर मशीन बदलून द्यावी किंवा खरेदी रक्कम ३ लाख ६० हजार रुपये व त्यावर ९ टक्के व्याज आणि इतर खर्च २० हजार रुपये एका महिन्यात देण्याचा आदेश दिला.
- Advertisement -

