Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीजलसंधारण विभागाच्या बंधारा बांधकामात अवैध वृक्षतोड व रेतीचा उपसा...- मुलचेरा तालुक्यातील गोमणी...

जलसंधारण विभागाच्या बंधारा बांधकामात अवैध वृक्षतोड व रेतीचा उपसा…- मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील प्रकार.. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावा नजिक असलेल्या कोळीगांव येथील छोट्या नदि पुला समोरील अतीदुर्गम भागात मृद व जलसंधारण विभाग गडचिरोलीच्या यांच्या मार्फतीने पाच करोड रुपयाच्या अनुदानातून पेसा कायद्या अंर्तगत बंधार्‍याचे बांधकाम हल्ली सुरु आहे.सदर बांधकामात जवळच असलेल्या नाल्यातील अवैध रेतीचा उपसा सुरु असुन नाल्याच्या अवती-भोवती असणाऱ्या झाडांची अवैधरित्या वृक्षतोड झालेली असल्याने संबंधित विभाग एवढे गप्प कां? असा सवाल नागरिकांकडून केला जातो आहे.

सध्याच्या घडीला शासनाने रेती घाटांचा कोणत्याच प्रकारचा लिलाव झाला नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती येतो कुठून? याचा शोध मुलचेरा तहसिलदारांनी घ्यायची गरज आहे.सदर कामावर आंध्राचा ठेकेदार राजरोसपणे काम करीत आहे.परंतु पेसा अंतर्गत कामाची पाहणी ग्रामसेवक ग्रामपंचायत गोमणी,अवैध वृक्षतोड वनपाल गोमणी व तलाठी साजा गोमणी यांची देखरेख असतांना सुद्धा सदर कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.गावकऱ्यांच्या तक्रारीवरून रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता आंध्राच्या ठेकेदारास अवैध रेती उपस्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उतर दिली.सदर जवळील नाल्यातूनच रेतीचा उपसा सुरु असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी दिसून होते.गोमणी वनविभागाच्या वनरक्षक धोंडा यांना सदर कामावरील अवैध वृक्षतोड बाबत बोरकर यांनी फोनवरून विचारणा केली असता,त्यांनीही उडवाउडवीची उतर दिली तर ग्रामसेवक वेलादी ग्रामपंचायत गोमणी यांना फोन करून विचारले असता त्यांनीही टाळाटाळ केली.तलाटी साजा गोमणी यांचा फोन बंद होता.सदर कामात अवैध रेतीमुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसुल बुडण्याची दाट शक्यता आहे. तहसिलदार मुलचेरा व वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.कोळीगांव नाला बंधारा बांधकामांमुळे फक्त जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होवू शकते व वरील भागात थोडी शेती आहे.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होवू शकते.

सर्व आजुबाजुला जंगल परिसर आहे.यातही याच बंधार्‍याच्या वर दोनशे पाऊलवार यापूर्वीच बंधारा बांधला गेला असून त्याच बंधाऱ्यांची अवस्था जिर्ण अवस्थेत असतांना मृद व जलसंधारण विभागाने पुन्हा काही अंतरावर त्याच ठिकाणी बंधारा बांधकाम करीत असल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.ग्रामसेवक, तलाठी व वनरक्षक यांनी सदर बंधाऱ्याची वेळीच पाहणी करून अवैध रेती उपसा व अवैध वृक्षतोड याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.नाहीतर माहीत असूनही माहीत नसल्याचे भासवणे म्हणजे ‘हमको क्या मालूम’ असे व्हायला नको.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!