Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीआता जंगली हत्तींच्या हालचालींबाबत पूर्व सूचनेसाठी मोबाईल अलर्ट सिस्टिम तयार करण्याचे निर्देश..

आता जंगली हत्तींच्या हालचालींबाबत पूर्व सूचनेसाठी मोबाईल अलर्ट सिस्टिम तयार करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी जलद कृती दल अधिक सक्रिय करण्यासोबतच हत्तींच्या हालचालींबाबत पूर्व सूचना मिळण्यासाठी मोबाईल अलर्ट सिस्टिम तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या जंगली हत्तींच्या वाढत्या वावरामुळे निर्माण होणाऱ्या मानव-हत्ती संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज, सोमवार २६ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी,अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश,उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव तसेच वनविभाग,पोलीस विभाग आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा वापर👇
हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि  संभाव्य धोका टाळण्यासाठी हत्तींना कॉलर आयडी लावण्याचे व हत्ती नागरी वस्ती पासून पाच किलोमीटरच्या परिसरात आल्यास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वेळीच इशारा देण्यासाठी ‘अलर्ट ॲप’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.यासोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी टेहळणी बुरुज (वाॅचटावर) उभारून सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे त्यांनी सांगितले
ग्रामसमिती मार्फत नियंत्रण👇
 प्रत्येक गावात ग्रामस्तरावर तलाठी,ग्रामसेवक, कोतवाल,पोलीस पाटील,महसूल व वनविभागाचे कर्मचारी यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन करून त्यांच्यावर उपाययोजना संदर्भात विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे त्यांनी सांगितले.हत्ती गावात दिसल्यास,समितीने तात्काळ १९२६ या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणे बंधनकारक राहील.ड्रोन व इतर उपकरणांच्या मर्यादा लक्षात घेता,स्थानिक नागरिकांच्या सहभागातून मिळणारी माहिती अधिक प्रभावी ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले.
सुरक्षिततेच्या सूचना आणि मानक कार्यपद्धती👇
हत्ती,विशेषतः टस्कर हत्ती,आक्रमक स्वभावाचे असून वेगाने हालचाल करतात.त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याजवळ जाण्याचा,फोटो काढण्याचा किंवा उगाच गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.हत्ती बंदोबस्तासाठी
वन विभाग,महसूल विभाग,पोलीस विभाग,कृषी विभाग व इतर सर्वांनी मिळून मानक कार्यपद्धती (SOP)तयार करण्याचे व त्यात ग्राम समित्यांची भूमिका स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.हत्तींपासून नुकसान झाल्यास भरपाई देतांना पोलीस यंत्रणेला सोबत नेण्याचे तसेच,हत्ती राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक तात्काळ थांबवावी,असेही निर्देश देण्यात आले.
महत्त्वाच्या उपाययोजना👇
प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून त्यांना कार्यक्षम बनवणे,हत्तींच्या हालचालीबाबत मोबाईल अलर्ट सिस्टिम विकसित करणे,संभाव्य धोक्यांसाठी पूर्वनियोजन तयार ठेवणे, आवश्यकतेनुसार पोलीस विभागाची मदत घेणे,टोल फ्री हेल्पलाइन नंबर कार्यान्वित ठेवणे,हत्तींच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी रेडिओ कॉलरिंग करणे
जनजागृती व समन्वयाची गरज👇
जंगली हत्ती नागरी वस्तीमध्ये न येण्यासाठी व त्याचे मार्ग परस्पर बदलविण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.त्यांनी वनविभाग,महसूल, पोलीस,कृषी व इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून अल्पकालीन व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना आखाण्याचे तसेच संयुक्त मानक प्रणाली तयार करण्याचे सांगितले.गावकऱ्यांना हत्तींच्या आगमनाच्या वेळी कसे वागायचे,काय टाळायचे,याचे प्रशिक्षण देणे व जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीला वनविभाग,महसूल विभाग व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!