- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पत्रकारांच्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकापर्ण सोहळा आणि पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ पुणे येथील जे डब्ल्यू मेरिएट या पंचतारांकित हॉटेल येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे,आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे,एबीपी माझाच्या संपादिका सरिता कोशिक,मंत्रालय पत्रकार संघटनेचे दिलीप सपाटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान,मुंबईचे संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राज माने यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीच प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापनेमागील उद्देश सांगितला.
प्रतिबिंब प्रतिष्ठान हे गरजू पत्रकारांच्या मुला-मुलींच्या भवितव्यासाठी काम करणारे असून या माध्यमातून पत्रकारांच्या मुला-मुलींसाठी प्रामाणिकपणे काम करेल.राज्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांना दिशा मिळण्यासाठी डिजिटल मीडिया पॉलिसी जाहीर झाली पाहिजे,अशी मागणी राज माने यांनी सोहळ्या प्रसंगी केली.गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी यांचे सह कार्यक्रमास उपस्थित विदर्भ समन्वयक सतीश आकुलवार,गडचिरोली जिल्हा सचिव सुरेश मोतकुरवार व एटापल्ली तालुकाध्यक्ष तेजस गुज्जलवार यांचाही डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार सम्मान चिन्ह देऊन ग्राम विकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- Advertisement -

