Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीचामोर्शी तालुक्यातील अल्पसंख्याक संस्थांची मागितली माहिती.. - कैलास बगमारे यांच्या तक्रारीची दखल..

चामोर्शी तालुक्यातील अल्पसंख्याक संस्थांची मागितली माहिती.. – कैलास बगमारे यांच्या तक्रारीची दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील विश्वशांती विद्यालय,कुनघाडा (रै) व विश्वशांती विद्यालय,भेंडाळा या भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली,ता.सावली,जि.चंद्रपुर या संस्थेद्वारे चालविल्या जात असून संस्थेने बोगस अल्पसंख्याक पत्राच्या आधारे शिक्षक भरती केल्याबाबतची तक्रार कैलास जे.बगमारे, जिल्हा सहसंयोजक,भारतीय जनता पार्टी-पंचायत राज्य ग्रामविकास विभाग यांनी दिनांक-२५ एप्रिल २०२५ व २९ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी यांना केली होती.त्यानुसार गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकारी बा.पाचखेडे यांनी शिक्षणाधिकारी(माध्य.),जिल्हा परिषद गडचिरोली यांना विश्वशांती विद्यालय,कुनघाडा (रै) व विश्वशांती विद्यालय,भेंडाळा यांचेकडून भारत शिक्षण प्रसारक मंडळ,सावली,ता.सावली,जिल्हा चंद्रपुर या संस्थेस मिळालेला अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र व अल्पसंख्याक दर्जा मिळणेकरीता परस्पर शासनास प्रस्ताव पाठविला अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रस्ताव पाठविण्यात आला याची माहिती घेण्यात यावी,तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ,सावली, ता. सावली,जिल्हा चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचे दुरध्वनी क्रमांक व संपूर्ण पत्त्यासह माहिती मागविण्यात आली आहे.त्यामुळे येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील आणखी काही मोठे घोटाळे उघडकीस येणार असल्याचे तक्रारकर्ते कैलास बगमारे यांनी म्हटले असल्याने पुढील घंटा ही धोक्याचीच म्हणावी लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!