Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीकाळाने झडप घातली अन् चिमुकली पितृछायेस मुकली..

काळाने झडप घातली अन् चिमुकली पितृछायेस मुकली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा शहरात एका २८ वर्षीय तरुणाचा रुग्णवाहिकेला साईड देण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लीप होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार ६ मे रोजी दुपारच्या सुमारास धानोरा शहरातील स्टेट बँकेसमोर घडली.भागचंद(भाईचंद) माणिक लीलारे रा.पठारी,जि.बालाघाट,छत्तीसगड असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.भागचंदचा विवाह झाला असून त्याला एक वर्षाची मुलगी आहे.येत्या १८ मे रोजी त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे.तो वाढदिवसासाठी गावाकडे जाणार होता.परंतु,काळाने झडप घातली आणि चिमुकली पितृछायेस मुकली.माहितीनुसार,भागचंद व त्याचे वडील धानोरा शहरातील बांबू डेपो मध्ये देखरेखीचे काम पाहतात.भागचंद हा आज मंगळवारी काही कामा निमित्त दुचाकीने शहराच्या बाहेर गेला होता.अशातच तो दुपारच्या सुमारास धानोरा शहरात परत आला व वास्तव्यास राहणाऱ्या घराकडे निघाला होता.त्यातच बऱ्याच कालावधीपासून धानोरा ते चातगांव महामार्ग रस्त्याचे काम सुरू असून खोदकाम सुरू होते. तितक्यातच मुरूमगावाकडून एमएच ३३ यु ४८३४ क्रमांकाची रूग्णवाहीका गडचिरोलीकडे जात होती व भागचंद घराकडे दुचाकी क्रमांक-एमएच ४९८ वाय ३१०६ ने जात होता.रूग्णवाहीका जवळ येताच त्याने साईड दिली.साईड देत असतांनाच खोदकाम केलेला दगड रस्त्यावर असल्याने त्यावरून दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागला.त्यातच भागचंदचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती धानोरा पोलीस प्रशासनास देण्यात आली.घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!