Tuesday, September 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता बँक खाते साफ करण्याचा नवा फंडा; लिंक नाही तर सुंदर तरुणीच्या...

आता बँक खाते साफ करण्याचा नवा फंडा; लिंक नाही तर सुंदर तरुणीच्या फोटोचा वापर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे नवनवे फंडे समोर येत असून,अशाच प्रकारे आणखी एक नवा फंडा समोर आला आहे.पूर्वी मोबाइलवर लिंक पाठवून बँक खाते रिकामे केले जात होते; परंतु,आता लिंकऐवजी एखाद्या सुंदर तरुणीचा फोटो मोबाइलवर पाठवून तुमचे बँक खाते रिकामे केले जात आहे.यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
मोबाइलची क्रांती झाल्यापासून घरबसल्या लाखो रुपये लोकांच्या खात्यातून क्षणात गायब होऊ लागले आहेत.नागरिकांच्या अज्ञानाचा तसेच बेसावधपणाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे नवनवे फंडे आत्मसात करीत आहेत.पूर्वी तुमचे एटीएम बंद पडले आहे, तुमच्या बँक खात्याची केवायसी करायची आहे,अशी
एक ना अनेक कारणे सांगून ओटीपी घेतला जात होता.कालांतराने हा फसवणुकीचा फंडा मागे पडला. यानंतर मोबाइलवर एखादी लिंक पाठवून संबंधिताने लिंक ओपन केल्यानंतर क्षणात संबंधिताचे बँकेचे अकाउंट रिकामे होत होते.अशा फसव्या लिंक ओपन केल्यानंतर आपले पैसे गायब होतात.हे नागरिकांच्या लक्षात येऊ लागल्यानंतर सायबर चोरट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ चा नवा फंडा समोर आणला आहे.अशातच आता सायबर चोरटे मोबाइलधारकांच्या मोबाइलवर विशेषतः रात्री ११ नंतर सायबर चोरटे सुंदर तरुणीचा फोटो पाठवत आहेत.हा फोटो पुरुष नक्कीच ओपन करून पाहणार,अशी मानसिकताही सायबर चोरट्यांनी ओळखली आहे.त्यामुळे ही रात्रीची वेळ चोरट्यांनी फोटो पाठविण्यासाठी निवडली आहे,असे पोलिस सांगताहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या मोबालइवरून अशा प्रकारचा फोटो आल्यास तो फोटो डाउनलोड न करता तातडीने डीलीट करा. कोणालाही फॉरवर्ड करू नका.चॅटिंग तसेच व्हिडीओ कॉलिंग करू नका.अशा अनोळखी व्यक्तीला मुळात प्रतिसाद देऊ नका.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!