Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोलीआता जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी ठेवण्यात येणार...

आता जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी ठेवण्यात येणार राखीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार असून त्यातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणाऱ्या परिणामकारक आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रस्ताव सूक्ष्म नियोजनासह तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,गुरुवार २४ एप्रिलला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतांना दिले.
सहायक जिल्हाधिकारी मानसी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज,जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजित राऊत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हाधिकारी पंडा यांनी दिव्यांग नागरिकांसाठी तयार करण्यात येणारे ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) वाटपाच्या प्रगतीबाबत विचारणा करून प्रलंबित ओळखपत्र तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत ‘नमो दिव्यांग शक्ती अभियान’, ‘निरामय आरोग्य विमा योजना’, युडीआयडी कार्ड नोंदणी मोहिम,दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्याचे उपक्रम तसेच नवजात बालकांसाठी श्रवण तपासणी युनिट,सहाय्य उपकरणांचे वाटप आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांचा देखील आढावा त्यांनी घेतला.प्रसंगी अभिजित राऊत व चेतन हिवंज यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीची माहिती दिली.यावेळी आरोग्य सेवा व समाजकल्याणचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!