Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीदिव्यांग विवाह प्रोत्साहनपर ५० हजाराचे लाभ वितरीत..

दिव्यांग विवाह प्रोत्साहनपर ५० हजाराचे लाभ वितरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १७ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास  प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या ११ जोडप्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३ लाभार्थी जोडप्यांना आज,गुरुवार १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रती जोडपे ५० हजार याप्रमाणे बचत प्रमाणपत्र,धनादेश व भेटवस्तू देण्यात आल्या.यासोबतच राज्यस्तरीय दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांचा देखील सुहास गाडे यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.कार्यक्रमास जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी वर्षा ढवळे,सहाय्यक लेखा व प्रशासन अधिकारी पुष्पा पारसे,विस्तार अधिकारी जगदीश मेश्राम,समाजकल्याण निरीक्षक निलेश तोरे तसेच निखील उरकुडे,माया गायकवाड,नरेश नायक यांचा सहभाग होता. समाजकल्याण विभागाचे तसेच दिव्यांग शाळांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!