Friday, June 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'लहरों से डर कर नौका पार नहीं होती; कोशिश करने वालों की...

‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती; कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’..! शाळेत नापास होणारे विद्यार्थीही बनले कलेक्टर अन् पोलीस अधिकारी.. – बारावीमध्ये हिंदी सोडून सर्व विषयात नापास झाले; गरिबीमुळे ते फुटपाथवर झोपले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती; कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’..!
राष्ट्रकवि सोहन लाल द्विवेदी यांनी लिहिलेली कविता एकेकाळी सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेण्ड करू लागली होती.सदरची कविता ही सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रसारित केली होती.कवितेच्या सुरुवातीला म्हटले आहे की,कुठलाही वा कितीही मोठा प्रसंग ओढवला तरी अश्या प्रसंगास घाबरून न जाता त्याचा डटकर सामना करून विजय मिळवला पाहिजे.आम्ही जेव्हा शिक्षण घ्यायचो, त्यावेळी आम्हाला स्पर्धा परीक्षा काय असते?दहावी, बारावी झाल्यानंतर काय करावे? या विषयी मार्गदर्शन करणारे कुणीही नव्हते.आम्हाला वाटायचे की, कलेक्टर,पोलीस अधिकारी,एसडीओ,बीडीओ, तहसीलदार मोठे हुशार व पहिल्या क्रमांकात पास होणारे अधिकारी असावेत,असे वाटायचे.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून शिक्षण घेत जाणे आणि टवाळक्या करणे,अशी दिनचर्या सुरू होती.मात्र,आता आम्हाला कळले की,कित्तेक मोठ-मोठे अधिकारी हे शालेय जीवनात नापास झालेले असून कुणाला कमी टक्केवारी तर कुणी एमपीएससी,यूपीएससी परीक्षा नापास होऊन हार न मानता अधिकारी बनलेले आहेत.खरंतर यूपीएससी(UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. अनेक विद्यार्थी आयएएस (IAS)आणि आयपीएस (IPS)अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात.अनेकजण आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न देखील पूर्ण करीत आहेत.विशेष म्हणजे,काही विद्यार्थी शाळेत नापास झाले,तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.अश्याच प्रकारे आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर ‘१२ वी फेल’ नावाचा चित्रपट बनला आहे.मनोज शर्मा हे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस(IPS-Indian police service-भारतीय पोलीस सेवा)अधिकारी आहेत.ते नववी आणि दहावीमध्ये कसेतरी पास झाले.बारावीमध्ये हिंदी सोडून ते सर्व विषयात नापास झाले.गरिबीमुळे ते फुटपाथवर झोपले.त्यांनी टेम्पो चालवला आणि लायब्ररीमध्ये, पिठाच्या गिरणीत काम केले.मनोज शर्मा यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास केला.दिल्लीमध्ये लायब्ररीमध्ये काम करीत असतांना त्यांनी
यूपीएससी(UPSC-Union public service commission-केंद्रीय नागरी सेवा)परीक्षेची तयारी केली.२००५ मध्ये चौथ्या प्रयत्नात ते आयपीएस अधिकारी बनले.त्यांचा यूपीएससी मध्ये १२१ वा क्रमांक होता.
अनेक परीक्षांमध्ये नापास होणारे आयएएस(IAS-Indian Administrative service-भारतीय प्रशासकीय सेवा) अवनीश शरण सोशल मीडियावर
खूप सक्रिय असतात.ते बिहारचे आहेत.अवनीश शरण शाळेत नापास झाले नव्हते.पण,त्यांना चांगले मार्क्स मिळत नव्हते.त्यांनी १० वी मध्ये फक्त ४४.७% गुण मिळवले.१२ वी मध्ये ६५% आणि ग्रेजुएशनमध्ये ६०% गुण मिळवले.ते एक सामान्य विद्यार्थी होते.शाळेत नाही,पण अवनीश राज्य प्रीलिम्स परीक्षेत १० वेळा नापास झाले.त्यानंतर त्यांनी यूपीएससीवर लक्ष केंद्रीत केले.पहिल्या प्रयत्नात ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले,पण अयशस्वी झाले.दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी चांगला रँक मिळवला आणि २००९ मध्ये आयएएस बनले.
अंजू शर्मा १९९१ मध्ये आयएएस अधिकारी बनल्या. त्या गुजरात कॅडरमध्ये होत्या.त्या अभ्यासात नेहमीच चांगल्या होत्या.पण,दहावीच्या केमिस्ट्रीच्या प्री-बोर्ड परीक्षेत त्या नापास झाल्या.बारावीत त्यांनी सर्व विषयात चांगले गुण मिळवले.पण, इकोनॉमिक्समध्ये नापास झाल्या.तरीही,त्यांनी हार मानली नाही.त्या १९९१ मध्ये आयएएस अधिकारी बनल्या.
वरील तिन्ही अधिकारी यांनी त्या कालावधीत खचून न जाता अपयशाला खत पाणी न घालता यश संपादन करून मानाचा तुरा रोवला आहे.त्यामुळे परीक्षेत नापास झाले किंवा कमी टक्केवारी मिळाली म्हणून मागे वळून पाहू नका,तर ‘अपयश ही यशाची पहिली पायरी’ मानून पुढील यश संपादन करा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!