Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोलीचार महिन्यांतच गुंडाळ-गांडाळ करून 'झकास ऐवजी भकास' कामे.. - कामाच्या ठिकाणी माहितीच्या...

चार महिन्यांतच गुंडाळ-गांडाळ करून ‘झकास ऐवजी भकास’ कामे.. – कामाच्या ठिकाणी माहितीच्या फलकांचा अभाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन ते चार महिन्यांच्या पूर्वीपासूनच विविध बांधकामांचा धूमधडाका सुरू केला जातो.शासकीय कामकाजात त्या वर्षातील १ एप्रिल ते ३१ मार्च हा आर्थिक वर्ष म्हणून गणला जातो.विशेषतः डिसेंबर,जानेवारी,फेब्रुवारी व आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा महिना म्हणजे मार्च ‘एंडिंग’ या कालावधीतच गुंडाळ-गांडाळ करून ‘झकास ऐवजी भकास’ कामे करून शासनास कोट्यवधीची देयके (बील)सादर केली जातात.अशातच जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी कित्तेक कामा संदर्भात माहिती फलक लावण्यात येत नसल्याने नेमक्या कोणत्या शासकीय योजनेतील बांधकाम आहे? किती किंमतीचे आहे? हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही.त्यातच रस्ते बांधकाम,नाली बांधकाम व इतर कामे करतांना प्रत्यक्ष कामात वापरण्यात येणारा सिमेंट वेगळाच तर देयक(बील) काढतांना जास्त दराच्या सिमेंटचे बीले जोडली जात आहेत.सदरची कामे निकृष्ट दर्जाचे व भ्रष्टाचाराला वाव देत असल्याने करण्यात येणाऱ्या कामांवर माहितीचे फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाच्या विविध योजनेतून पायाभूत सुविधांसह विविध विकास कामे केली जातात.कामात पारदर्शकता असावी म्हणून कामाच्या तांत्रिक मान्यतेसह सामाजिक किंमत व यंत्रणेच्या नावासह माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावले जाते.पण बांधकाम विभागामार्फत अनेक बांधकामे करून माहिती फलक न लावता बिलाची उचल करण्यात येत असल्याची ओरड सुरू आहे.फलक लावले नसल्याने कामात अनियमितता होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.कित्तेक कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता कार्यालयातच बसून कामाचे मोजमाप करून बिल पास केले जात आहेत.बांधकाम विभागामार्फत गावस्तरावर विशेषतः सिमेंट-काँक्रीटचे  रस्ता व नाली बांधकाम मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र ज्या ठिकाणी नाली,रस्ते सुस्थितीत आहेत,तेथे जुने बांधकाम जेसीबी मशीनच्या सहाय्याने पूर्णतः नष्ट करून दुरुस्तीच्या नावाखाली गरज नसतांना नवीन बांधकाम करण्यात येत आहेत.विशेष म्हणजे,ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव सादर करण्यात येतात. मात्र,ज्या ठिकाणी कामाची गरजही नाही,अश्याही ठिकाणी कामे आणून शहानिशा न करता अंदाजपत्रक तयार करून कामे केली जात असल्याने ही नवलाची बाब आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!