Wednesday, August 26, 2026
Homeअकोलाव्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवली जीवनयात्रा.. - मृत्यूपूर्वी पत्नीला संपत्तीतून केले बेदखल..

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवली जीवनयात्रा.. – मृत्यूपूर्वी पत्नीला संपत्तीतून केले बेदखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
अकोला :-जिल्ह्याच्या तेल्हारा तहसील कार्यालयांतर्गत कार्यकरत असलेल्या तलाठ्याने व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याची घटना काल,रविवारी ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तलाठ्याने व्हॉटसअपवर स्टेटस ठेवत आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे.शिलानंद माणिकराव तेलगोटे वय ३९ वर्षे,रा.तेल्हारा,शाहूनगर, गाडेगाव रोड,तेल्हारा असे आत्महत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते.यात ‘मी श्री.शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९ वर्षे,रा.तेल्हारा, शाहूनगर,गाडेगाव रोड, तेल्हारा).मी दिनांक ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे.माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असे सांगते.माझे पैसे तिचा भाऊ श्री.प्रवीण गायबोलेकडे असून,त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती.सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे.कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे.माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की,माझं पोस्टमार्टम होईल,तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये.कारण आज मी पाच दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल.असे शिलानंद तेलगोटे यांनी स्टेटसवर म्हटले होते. घटनेनंतर पोलीसांनी तलाठी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला व पुढील तपास शवविच्छेदानाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मृत्यूपत्र देखील तयार केले असल्याचे समोर आले आहे.यात त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर करून पत्नीला संपत्तीतून बेदखल केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!