Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकारची ट्रकला जोरदार धडक; आयपीएस अधिकाऱ्यासह एकाचा मृत्यू...

कारची ट्रकला जोरदार धडक; आयपीएस अधिकाऱ्यासह एकाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देवदर्शनासाठी कारने जात  असतांना वाटेतच कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोनमध्ये तैनात असलेले डीसीपी(DCP)सुधाकर पठारे यांचेसह परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २९ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तेलंगणातील श्रीशैलमहून नगरकुर्लुणला जात असतांना घडली.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते.अशातच आज शनिवारी पठारे व सहकारी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते.
सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.पठारे हे मूळचे वाळवणे,ता.पारनेर, जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत.आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत.ते ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि  अपघात झाला.सुधाकर पठारे यांनी एमएससी (कृषी) आणि एलएलबी केले होते.१९९५ मध्ये स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक झाले.यानंतर, १९९६ मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. १९९८ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ते पोलीस विभागात रुजू झाले.आतापर्यंत सुधाकर पठारे यांनी पंढरपूर, अकलूज,कोल्हापूर शहर, राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी चंद्रपूर,वसई येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अमरावती येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.पठारे यांच्या अपघाताने पोलीस प्रशासनात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!