Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले असल्याने नक्षली संघटनेला मोठा हादरा बसला आहे.यातील १९ नक्षलवाद्यांपैकी  ९ नक्षलवाद्यांवर शासनाने २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.विजापूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले की,सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे, यामध्ये छावण्या उभारणे याचा समावेश आहे.आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी आंध्र-ओडिशा बॉर्डर विभाग आणि माओवाद्यांच्या पामेड एरिया कमिटीमध्ये विविध पदांवर सक्रिय होते.आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी देवा पदम वय ३० वर्षे आणि त्याची पत्नी दुले कलामू वय २८ वर्षे हे बटालियन क्रमांक- १ चे वरिष्ठ सदस्य म्हणून सक्रिय होते.शासनाने त्यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अशातच एरिया कमिटी सदस्य सुरेश कट्टम वय २१ वर्षे याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते,तर आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवाद्यावर  २ लाख रुपयांचे बक्षीस होते.तर इतर पाच नक्षलींवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!