Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीअल्पवयीन मुलींना लागले सोशल मीडियाचे वेड - सोशल मीडियातूनच होतोय घात...

अल्पवयीन मुलींना लागले सोशल मीडियाचे वेड – सोशल मीडियातूनच होतोय घात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- हल्ली सोशल मीडियाचा वापर सर्वात जास्त वाढलेला दिसून येतो.अशातच अल्पवयीन मुलींचा सोशल मीडियावरील वापर अधिक घातक ठरत आहे.मागील काही वर्षांत घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना मित्र,सोशल मीडियाद्वारे झालेली ओळख यातून घडल्याचे दिसून येत आहे.१५ ते १७ वयोगटातील मुलींसोबत मैत्री वाढवून अनेक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत.त्यावरून कुमार वयातील पायरी चढतांनाच त्यांचा तोल घसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र,त्यामध्ये बहुतांश घटना या परिचित व्यक्ती,नातेवाईक यांच्याकडूनच घडलेल्या दिसून येतात.विवाहित महिलांसह अल्पवयीन मुली बळी पडलेल्या आहेत.

कित्येक महिला अत्याचाराच्या बळी पडतांना निदर्शनास येऊ लागले आहे.त्यामध्ये बलात्कार, अपहरण,विनयभंग,कौटुंबिक अत्याचार,हत्या अशा घटनांचा समावेश आहे.सर्वाधिक घटना सोशल मीडियामुळे झालेल्या ओळखतीतून,जवळचे मित्र यांच्याकडून घडलेल्या आहेत.कुमार वयात येत असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, परिस्थितीचा फायदा घेऊन चांगली स्वप्ने दाखवून पळवून नेले जात आहे.

यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करून सोडून दिले जाते. अथवा पोलिसांकडून त्यांचा शोध घेऊन पुन्हा कुटुंबांच्या ताब्यात दिले जाते.अशा घटनांमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून अटकदेखील केली जाते.सदर प्रकरणावरून अनोळखी व्यक्ती वा इतर यांच्याशी नाहक वा विनाकारण गोष्टी टाळून सोशल मीडियाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!