Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीसाठी दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार..

गडचिरोलीसाठी दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात आला.कल्याणी समूहासोबत संरक्षण,स्टील,ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला.यात गुंतवणूक ५२०० कोटी रुपयांची असून ४००० रोजगार निर्मिती होणार आहे.
यासोबतच गडचिरोली आणि नागपूर भागात स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा,पायाभूत सुविधा,सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज,सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात कार्यरत जेएसडब्ल्यू या कंपनीसोबत ३ लाख कोटींचा सामंज्यस्य करार करण्यात आला आहे.यातून १० हजार रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या गुंतवणूक करार मध्ये हा सर्वाधिक रकम गुंतवणूकीचा करार आहे.
गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही तर पहिला जिल्हा असल्याचे मुख्यमंत्री यांनी नुकतेच गडचिरोलीत सांगितले होते.त्‍यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासाठी पहिल्या दिवशी ऐतिहासिक ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले.एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे,हा एक नवा विक्रम आहे.महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
 पहिल्या दिवशी झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह,रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर,बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा.लि.,एबी इनबेव,जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी,टेम्बो,एलमाँट,ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी,अवनी पॉवर बॅटरिज,जेन्सॉल,बिसलरी इंटरनॅशनल,एच टू पॉवर, झेड आर टू,ब्ल्यू एनर्जी मोटर्स,इस्सार,बुक माय शो,वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून,लॉजिस्टिक,ऑटोमोबाईल्स,स्टील, इलेक्ट्रॉनिक्स,आयटी,पायाभूत सुविधा,करमणूक, हरित ऊर्जा,ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत. इतर दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!