- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गुप्त माहितीच्या आधारे
छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये डीआरजी,एसटीएफ आणि सीआरपीएफच्या चमूने संयुक्त कारवाई करीत ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या इंदागांव ठाणा क्षेत्राच्या सोरनामाल जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक झाली.जवानांनी मोठा फौजफाटा घेऊन नक्षल्यांना हुसकावून लावले. नक्षल्यांच्या शोध मोहिमेसाठी ३०० जवान रात्री उशिरा बाहेर पडले होते.डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी तीन नक्षल्यांना ठार केले. ओडिशाच्या नवरंगपूरहून आलेल्या सैनिकांनीही नाकाबंदी करीत शोध मोहीम सुरू केली.नक्षलिंच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

