Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीकठिण प्रसंगी मार्गदर्शन,उपजीविकेचे साधन तथा मदतीकरिता महिलांनी 'स्त्री शक्ती' पोर्टलवर नोंदणी करण्याचे...

कठिण प्रसंगी मार्गदर्शन,उपजीविकेचे साधन तथा मदतीकरिता महिलांनी ‘स्त्री शक्ती’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कोणत्याही कठिण प्रसंगी महिलेला मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे आणि प्रत्येक ठिकाणी गरज भासल्यास मदत मिळणे सोपे व्हावे; याकरीता आयुक्त कार्यालय,महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे यांचे द्वारा स्त्रीशक्ती पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
सदर स्त्री शक्ती या पोर्टलव्दारे शासकीय, निमशासकीय, खासगी,विद्यालये,महाविद्यालये,जिल्हा परिषद शाळा, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, रुग्णालय,पोलीस विभाग,वकिल,महिला संबंधित काम करणाऱ्या संस्था तसेच इतर कोणतेही छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या किंवा इतर ‍ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे व संकटकाळी मदत मिळणे तसेच मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल,याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत- जास्त महिलांनी स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी करण्याचे
आवाहन प्रकाश भांदककर,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली तसेच प्रणाली सुर्वे केंद्र प्रशासक (प्र.)सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली यांनी  केले आहे.
स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी कसे करायचे?👇
Google वर जावून strishakti.org या वेबसाईट वरुन महिलेचे सपूर्ण नाव,ई-मेल ‍किंवा मोबाईल क्र., पत्ता,जन्म तारिख टाकून नोंदणी करणे.तसेच पासवर्ड स्वत: तयार करुण घेणे.
संपर्क कुठे करावा?👇
कार्यालय संपर्क क्रमांक :- 07132-295675
कार्यालय मोबाईल क्रमांक :- 9404354543
कार्यालय पत्त :-जुनी धर्मशाळा,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर,मुल रोड कॉम्प्लेक्स,गडचिरोली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!