Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीअन् सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून धाड-धाड करीत सुटल्या गोळ्या; न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू.....

अन् सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून धाड-धाड करीत सुटल्या गोळ्या; न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू.. – गडचिरोलीतील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असणारे ४३ वर्षीय उमाजी होळी यांच्या बंदुकीतून एकापाठोपाठ एक अशा सात गोळ्या सुटून तीन गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्याने होळी यांचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवारी ११ डिसेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली.होळी यांनी जीवन संपवले की अनावधानाने त्यांच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या,याचा तपास सुरू आहे.
उमाजी होळी हे जिल्हा पोलिस दलात अंमलदार असून,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.नेहमीप्रमाणे आज बुधवारी  होळी व अन्य सुरक्षारक्षक हे न्यायाधीशांना घेऊन न्यायालयात गेले.न्यायाधीश वाहनातून उतरल्यानंतर चालकाने सुरक्षारक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारातील एका झाडाखाली पार्क केले.त्यानंतर अन्य सुरक्षा रक्षक वाहनातून उतरले,तर उमाजी होळी हे वाहनातच बसून होते.काही वेळातच होळी यांच्या बंदुकीतून एकापाठोपाठ एक अशा सात गोळ्या सुटल्या.यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या, उर्वरित गोळ्या वाहनाच्या छतातून बाहेर निघाल्या.या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.पोलिस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अंमलदार होळी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.होळी यांनी जीवन संपवल्याची चर्चा परिसरात होती.त्यांनी जीवन संपवले की अनावधानाने त्यांच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या,याविषयी पोलिस तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!