Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी... सिंचन विहीर अनुदानात वाढ; आता सिंचन विहीर करीता 'यांना'...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… सिंचन विहीर अनुदानात वाढ; आता सिंचन विहीर करीता ‘यांना’ मिळणार ४ लाख रुपये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कृषि विभाग जिल्हा परीषद गडचिरोली मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत आहे.अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांकरिता ही योजना असून त्यांना या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा व औजारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या योजनेसाठी समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.दिनांक -३ डिसेंबर २०२४ चे कृषि आयुक्तालयाचे मार्गदर्शक सुचनानुसार सन २०२४-२५ या वर्षापासून सिंचन विहीरीकरीता ४ लाख रुपये,जुनी विहीर दुरूस्तीकरीता १ लक्ष रूपये, इनवेल बोअर करीता ४० हजार रूपये,विद्यूत जोडणीकरीता २० हजार रूपये,पंपसंच करीता खर्चाच्या ९० टक्के किंवा ४० हजार रूपये,सौर कृषि पंपाकरीता खर्चाच्या ९० टक्के किंवा ३० हजार रुपये पर्यंत,तुषार सुक्ष्म सिंचनाकरीता १५ टक्के किंवा ४७ हजार रूपये मर्यादेत,ठिबक सिंचन संचाकरीता १५ टक्के किंवा रूपये ९७ हजार रुपये मर्यादेत पुरक अनुदान,शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख रुपये पर्यंत,एचडीपीई/ पीव्हीसी पाईप खर्चाच्या १०० टक्के किंवा ५० हजार रुपये पर्यंत,बैलचलित/ ट्रक्टरचलित औजारे- यंत्रसामुग्री ५० हजार रूपये व परसबाग- बियाणे/कलमे/रोपे/खते/औषधे करीता ५ हजार रूपये अनुदान मिळणार आहे.या योजनेकरीता महाडिबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtra.gov.in /farmer/login/login या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनु.जाती,नवबौध्द व आदिवासी शेतकरी असावा.त्याच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.त्याच्याकडे जमीनधारणेचा ७/१२ असावा. लाभार्थ्याकडे स्वताचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.लाभार्थ्याकडे स्वताचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर एवढी शेतजमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीव्दारे करण्यात येणार असून अनुदान अदा करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईनच होणार आहे.योजनेच्या सविस्तर माहीतीकरीता पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा; असे आवाहन जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कृषि विकास अधिकारी कु.किरण खेामणे व जिल्हा कृषि अधिकारी प्रदिप तुमसरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!