Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील ४८ व्या सत्रात भावना रामटेके विजयी...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील ४८ व्या सत्रात भावना रामटेके विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे ४८ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३१ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चामोर्शी येथील कवयित्री कु.भावना रामटेके यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “आभास” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
कु.भावना रामटेके ह्या चामोर्शी,जि.गडचिरोली येथील  नवोदित कवयित्री असून त्यांनी अनेक कवितांचे लेखन केले आहे.नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भातील रानफुले’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ४८ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे,संगीता ठलाल,पुनाजी कोटरंगे,माधुरी अमृतकर,पांडुरंग मुंजाळ,वामनदादा गेडाम,वंदना सोरते,गणेश रामदास निकम,रेखा दिक्षित,मुर्लीधर खोटेले,संतोष कपाले,प्रेमिला अलोने,जयराम धोंगडे, तुळशीराम उंदीरवाडे,कु.भावना रामटेके,रोहिणी पराडकर,मंदाकिनी चरडे,यामिनी मडावी,पी. डी.काटकर,रंजना चुधरी,मधुकर दुफारे,उकंडराव नारायण राऊत,गणेश रामदास निकम,पुरुषोत्तम लेनगुरे,शैला चिमड्यालवार,ज्योत्स्ना बन्सोड, चरणदास वैरागडे,सुनिल चडगुलवार,खुशाल म्हशाखेत्री,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!