- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीत सर्वत्र बंडखोरांनी बंड पुकारून पक्षाविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामुळे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या पक्षीय बंडखोरांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे; अशी माहिती काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज,गुरुवारी ७ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत दिली.
चेन्निथला म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काँग्रेस पक्षातील बंडखोरांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. त्यांना नोटीस बजावण्याची सूचना जिल्हा काँग्रेसला देण्यात आली आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडी कोठेही मैत्रीपूर्ण लढत लढणार नाही.महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व बंडखोरांना निलंबित करण्यात आले आहे.”
महाविकास आघाडीचा जाहीरनामा १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल,असे सांगत काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे,लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी,पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, पक्षातील वरिष्ठ नेते आणि कर्नाटक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.१३ नोव्हेंबरपासून पाच दिवस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्रात असतील.तर राहुल गांधी हे १२,१४ आणि १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत.प्रियांका गांधी १३,१६ आणि १७ नोव्हेंबरला राज्यात प्रचारात सहभागी होणार असल्याचेही रमेश चेन्निथला यांनी कळविले.
- Advertisement -

