Monday, July 13, 2026
Homeनागपूरडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती माहिती अधिकार अधिनियमात येत नसल्याचा निर्णय...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती माहिती अधिकार अधिनियमात येत नसल्याचा निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही प्रत्यक्षात माहिती अधिकार अधिनियमात (आरटीआय) येत नाही; असा निर्णय महाराष्ट्र राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाने दिला.स्मारक समितीचे (दीक्षाभूमी) अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
डॉ.पुरण मेश्राम यांनी माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत स्मारक समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे ९ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्ज सादर केला होता.मागील दहा वर्षांपासून सदस्यता शुल्क दिलेल्या सदस्यांची रकमेसह वर्षनिहाय यादी,नोंदणी झालेल्या सदस्याला असलेल्या विशेषाधिकारासंबंधीची माहिती दस्तावेजात नमूद आहे; त्याची प्रत,मागील दहा वर्षांपासून ५०० व त्यापेक्षा जास्त दान दिलेल्या संरक्षकांची यादी व त्यांना असलेल्या अधिकारासंबंधीची माहिती ज्या दस्तावेजात असेल त्याची प्रत देण्यात यावी; अशी मागणी केली होती.मात्र,स्मारक समितीकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयोग,नागपूर खंडपीठाकडे अपील सादर केला होता.आयोगाकडून स्मारक समितीचे अध्यक्ष,सचिव यांना नोटीस बजावण्यात आली.मागितलेल्या माहितीचा अहवाल सादर करावा; असे नोटीसमध्ये म्हटले होते.
अपील अर्ज निकाली काढत असतांना,त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे महत्त्व लक्षात घेता,स्मारक समिती ही प्रत्यक्षात माहिती अधिकार अधिनियमात येत नसल्याचा निर्णय खंडपीठाने दिला.मात्र,समितीचे स्वरूप व दीक्षाभूमीवर असलेली लोकांची आस्था लक्षात घेता,उपरोक्त समितीने स्वतः माहिती अधिकाराला अपेक्षित असलेला प्राप्त निधी,प्राप्त शासकीय अनुदान,त्याचा झालेला विनियोग,त्या अनुषंगाने झालेली विकासकामे,विविध प्राधिकरणांशी याबाबतीत झालेला पत्रव्यवहार,त्यांच्याकडून प्राप्त प्रस्ताव,त्याअनुषंगाने समितीने घेतलेले निर्णय, याबाबतीत जास्तीत जास्त माहिती ही स्वतः उपलब्ध करून दिली तर ते माहिती अधिकार कायदा बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल,असे म्हटले.
भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई,अध्यक्ष, दीक्षाभूमी स्मारक समिती👇
भारतीय सार्वजनिक जीवनामध्ये सूचिता,निष्ठा, प्रामाणिकपणा याचा समावेश असण्याबाबत सातत्याने आग्रही भूमिका घेणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ही मानवंदना ठरेल.त्यामुळे अशी कृती स्मारक समितीने करावी,या अपेक्षेसह प्रस्तुत द्वितीय अपील अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!