Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यात १० उमेदवारांचे १३ नामनिर्देशन अर्ज दाखल.. - आरमोरी विधानसभा...

आज गडचिरोली जिल्ह्यात १० उमेदवारांचे १३ नामनिर्देशन अर्ज दाखल.. – आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कृष्णा गजबेंनी दाखल केला अर्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ साठी गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवारी उमेदवारांकडून एकूण १३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.आरमोरी (अ.ज.)या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले यात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन तर प्रा.रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला आहे.
गडचिरोली (अ.ज.)या विधानसभा मतदारसंघात सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले.यात भरत मंगरूजी येरमे (वंचित बहुजन आघाडी) यांनी दोन अर्ज दाखल केले तर बाळकृष्ण वंगणुजी सावसाकडे (अपक्ष), डॉ. मिलिंद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी),जयश्री विजय वेळदा (भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष), मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अहेरी (अ.ज.)विधानसभा मतदारसंघात आज चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले.यात हनमंतू गंगाराम मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन नामनिर्देशनअर्ज भरले.तसेच आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट) व राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १५ उमेदवारांकडून एकूण १९ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज २८ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून ५ व्यक्तींनी १२ नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून २ व्यक्तींनी ५ अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून ९ व्यक्तींकडून १० अर्जाची उचल करण्यात आली आहे.जिल्ह्यात आज २८ तारखे पर्यंत  एकूण २१३ नामनिर्देशन अर्जाची उचल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून उद्या २९ ऑक्टोंबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे.अर्जांची छाननी ३० ऑक्टोंबरला करण्यात येणार असून ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल.मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!