Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीअहेरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा..

अहेरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज,बुधवारी अहेरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात भेट देऊन निवडणूक तयारीचा यंत्रणेकडून आढावा घेतला.त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय नामनिर्देशन, छाननी,चिन्ह वाटप आणि दैनंदिन अहवाल शाखेत निवडणूक कामकाजाची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम,अहेरीचे निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यावेळी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी तहसिल कार्यालय अहेरी येथे निवडणूक खर्चाचा आढावा घेतला.निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार,संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष देण्याचे व खर्चाच्या लेखानोंदी घेण्याबाबत तसेच एसएसटी व एफएसटी पथकाला करावयाच्या कार्यवाहीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील,एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे,सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमारे तसेच संबंधीत अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!