Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! ग्रुप ॲडमिनने विशेष काळजी घ्यावी; सायबर सेलची करडी नजर...

सावधान..! ग्रुप ॲडमिनने विशेष काळजी घ्यावी; सायबर सेलची करडी नजर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्यामार्फत चुकीची माहिती तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करण्यात येत आहे.प्रत्येक अकाउंटवर लक्ष असून, नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समाज माध्यमे सर्वांच्या हाती असून,याचा दुरूपयोग होता कामा नये.एखादी तथ्यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविण्याचे सामर्थ्य समाज माध्यमात आहे.त्यामुळे व्हॉटसॲप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.ग्रुप ॲडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी; असे आवाहन एमसीएमसीमधील समाज माध्यमांचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक यांनी केले आहे.उमेदवारांसाठी सूचना सर्व उमेदवारांना स्वतःच्या समाज माध्यमांची अधिकृत खाती (फेसबुक,व्टिटर,इन्स्टाग्राम, ब्लॉग) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सर्व समाज माध्यम प्रतिनिधींनी आपल्या माध्यमांची नोंद आयोगाकडे करावी.समाज माध्यमांवरून अफवा पसरविणे,जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे,दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती,याबाबत गंभीर गुन्ह्यांची नोंद होऊ शकते.त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!