Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहाविकास आघाडीची आज संध्याकाळी किंवा उद्या पहिली यादी जाहीर होईल- विजय वडेट्टीवार

महाविकास आघाडीची आज संध्याकाळी किंवा उद्या पहिली यादी जाहीर होईल- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मंगळवारी म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे.तत्पूर्वी विविध पक्षांच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.काल,रविवारी भाजपाच्या वतीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र,महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे.अशातच महाविकास आघाडीत अंतिम १७ जागांवर चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत जागा वाटपाची चर्चा संपेल.तसेच आमचा ठाकरे गटासोबत ४ ते ५ जागांवर वाद सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.तीन पक्ष आहेत. तीन पक्षांमध्ये आघाडीमधून लढताना काही प्रमाणात नाराजीला सामोरे जावे लागते.नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू आणि महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ,असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
जागावाटपात कोणत्या भागात कुणाला कोणती जागा सुटली,याबाबत हायकमांडशी चर्चा केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत मल्लिकार्जुन खर्गे आणि वेन्युगोपाळ यांच्याशी चर्चा केली.काही जागांवर पेच निर्माण झाला होता; त्यावर काय मार्ग काढावा याबाबतही हायकमांडशी चर्चा केल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. आज संध्याकाळी किंवा उद्या पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!