उद्रेक न्युज वृत्त :-पावसाने पूर येईपर्यंत सर्वत्र दमदार हजेरी लावली.मात्र,आता पावसाचा जोर ओसरला असून राज्यातील काही भागांतच हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.त्यानुसार मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे.नागपूर,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा,अकोला, यवतमाळ,धाराशिव,बुलडाणा,लातूर,हिंगोली,परभणी व नांदेड या जिल्ह्यांत उद्या, बुधवार १६ जुलै ते १८ जुलै दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.राज्यात हवेचे दाब वाढल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.त्यामुळे तुरळक भागातच मध्यम पाऊस सुरू आहे.अश्यातच राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी झाला आहे.हिच स्थिती येत्या २२ जुलैपर्यंत राहणार असून,जुलैच्या शेवट-शेवट पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाचा जोर ओसरला; काही भागांतच पडेल हलका पाऊस..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

