Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीधान विक्री करतांना कोणत्याही प्रकारची हमाली किंवा कोणत्याही प्रकारची रोख रक्कम खरेदी...

धान विक्री करतांना कोणत्याही प्रकारची हमाली किंवा कोणत्याही प्रकारची रोख रक्कम खरेदी केंद्राना देऊ नये.. – जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमी. अंतर्गत गडचिरोली जिल्हास्तरावर शासनाची अभिकर्ता संस्था म्हणून जिल्हा मार्केटिंग अधिकारी,कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत देसाईगंज(वडसा),आरमोरी, गडचिरोली,चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात धान खरेदी प्रक्रिया राबवित आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन लिमी. कार्यालय जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली मार्फत शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की,आधारभुत किंमत खरेदी योजना हंगाम २०२५-२६ मध्ये शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार धान खरेदी करीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी व धान विक्री करतेवेळी पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करतेवेळी कोणत्याही प्रकारची नोंदणी शुल्क देय नाही.धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडुन धान खरेदी करतेवेळी एका कट्ट्याचे वजन ४० किलो ६०० ग्रॅम पेक्षा जास्त घेता येत नाही. शेतकऱ्यांनी धान विक्री करतांना कोणत्याही प्रकारची हमाली रक्कम किंवा कोणत्याही प्रकारची रोख रक्कम खरेदी केंद्राना देऊ नये.त्याअनुषंगाने वरील प्रमाणे सुचनेनुसार आपल्यामार्फत पिकविलेला साधारण धान कवडीमोल भावाने कोणत्याही व्यापाऱ्यास तथा इतरत्र न विकता शासनाने दिलेल्या आधारभुत दरानेच विक्री करावयाच्या दृष्टीने तालुक्यातील शासनाच्या धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन धान खरेदी केंद्रावर धान विक्री करावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेला बळी पडु नये.धान खरेदी केंद्रावर धान विक्री करतेवेळी कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळुन आल्यास/झाल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी, कार्यालय गडचिरोली येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!