Tuesday, May 5, 2026
Homeगडचिरोलीधानाच्या बोनसची ५० टक्के निधी आली; पण कुणाला मिळणार शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली..!

धानाच्या बोनसची ५० टक्के निधी आली; पण कुणाला मिळणार शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याच्या महायुती सरकारने शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते.त्यानुसार बोनस केव्हा मिळणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.अश्यातच आता सध्याच्या घडीला शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या बोनससाठी ५० टक्के निधी देण्यात आला आहे. मात्र,सदरचा निधी कुणाला मिळणार आहे,याची धाकधूक शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे.कारण,यापूर्वी प्रत्यक्ष धान विक्री करणारे शेतकरी व धान विक्री न करताच केवळ शासकीय धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही बोनसची रक्कम टाकण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद काहीकाळ गगनात मावेनासा झाला होता.मात्र,आता ५० टक्के निधीत बोनससाठी नंबर लागणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • बोनससाठी तीन याद्या तयार👇
प्रत्यक्ष धानाची विक्री करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या पन्नास टक्के निधीतून बोनसचे वितरण करण्यात येणार आहे.मात्र,यासाठी आदिवासी विकास विभागाकडे वेगवेगळ्या तीन याद्या तयार करण्यात आल्याची माहिती आहे.पहिल्या यादीनुसार सुरुवातीला बोनसचे वितरण होण्याची दाट शक्यता आहे.सोबतच वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची दुसरी यादी,तर दोन्ही याद्यांमध्ये नावांचा समावेश नसलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी तयार करण्यात आली आहे.या याद्यांमधून ज्यांची कागदपत्रे बरोबर आहेत,त्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होणार आहे.येत्या दोन दिवसात अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर माय-लेकीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त   नागपूर :-नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात शुक्रवार,१ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास माय-लेकीने एकाच वेळी घरातील एका लोखंडी रॉडला गळफास...

कृषी विभागाच्या प्रस्ताव प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ‘२० कोटींचे मागणीपत्र बनावट’ या वृत्तातील आरोपांचे खंडन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कृषी विभागाने दिलेले २० कोटींचे मागणीपत्र बनावट असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून,सर्व प्रस्ताव शासनाच्या नियम व प्रशासकीय निकषांनुसारच...

धक्कादायक..! नियोजित कट रचून पत्नीने केली शिक्षक पतीची हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील घोडपेठ गावातील कर्मवीर शाळेजवळ दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेह प्रकरणी धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर आल्याने सर्वजण अवाक् झाले...

शंभर टक्के अनुदानावर मिळणार चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून जमीन विक्रीचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!