Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड आहेत; मग पैसे त्याच खात्यातच कसे...

जगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड आहेत; मग पैसे त्याच खात्यातच कसे जातात? – क्यूआर कोड बाबत माहिती घ्या जाणून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपटरी चालवणाऱ्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जातात.एक वेळ अशी होती की,क्वचितच कोणी ऑनलाईन पेमेंट वापरायचे.शिवाय मोठ्या व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट वापरले जायचे.पण आता अगदी एक रुपयाचे ऑनलाईन व्यवहारदेखील केले जात आहे.पण आता यासंदर्भात असा प्रश्न उपस्थित झाला की,सर्व क्यूआर कोड सारखेच दिसतात, असे जगात लाखो प्रकारचे क्यूआर कोड आहेत,मग पैसे कसे त्याच खात्यातच जातात? याचे उत्तर असे आहे की,सारखे दिसणारे क्यूआर कोड एका खास पॅटर्नवर बनवले जातात.बहुतेक कोडमध्ये काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या असतात.हे कोड फक्त सॉफ्टवेअरद्वारे समजू शकतात.
जेव्हा-जेव्हा एखादी कंपनी एखाद्या वापरकर्त्याला क्यूआर कोड देते,तेव्हा त्याची सर्व माहिती सॉफ्टवेअर दरम्यान त्या क्यूआर कोडशी जोडली जाते.यामुळे जेव्हा कोणतेही पेमेंट दुसऱ्या व्यक्तीला पाठवावे लागते,तेव्हा ते त्याच खात्यातून जाते ज्याला ते जोडलेले आहे. त्याचप्रमाणे,पेमेंट प्राप्त करण्यासाठी, सर्व माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध आहे.कंपनी हे सर्व सॉफ्टवेअरद्वारे करते.सर्व क्यूआर कोडसारखे दिसतात का? याचे उत्तर नाही असे आहे.ते त्याच्या डिझाईनमुळे आपल्याला सारखे दिसू शकतात,पण ते सारखे नाही.जेव्हा तुम्ही क्यूआर कोड काळजीपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की,त्याचा नमुना इतर क्यूआर कोडपेक्षा वेगळा आहे.क्यूआर कोड बनवणारी कंपनी हे आधीच चेक करते की,त्यांनी जनरेट केलेला क्यूआर एका व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणालाही जाणार नाही.कोरोनाच्या काळात देश डिजिटल युगाकडे वळले,ज्यानंतर आता सर्वच लोक कोणत्याही व्यवहारासाठी ऑनलाईन ऑप्शन स्वीकारतात. कारण,यामुळे आपल्याला खर्चाचा ट्रॅक राहतो,शिवाय सुट्या पैशांची चिंता नाही आणि सोबत पैसे घेऊन जाण्याचाही प्रश्न नाही.फोन सोबत असला की,झाले काम सोपे.बहुतांश ऑनलाईन ट्रान्झेंक्शन हे क्यूआर कोड स्कॅन करून केले जातात.पैसे पाठवणारा आपल्या फोनमध्ये समोरील क्यूआर कोड स्कॅन करतो,पैसे पाठवतो आणि ते पैसे त्या क्यूआर कोडशी संलग्न बँक खात्यात वळते होतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!